माझं शालेय काव्य संमेलन
सकाळ सकाळ भाच्याने मला विचारले .....
मामा तुम्हाला कविता येते न हो .....मग जरा करा कि उगवती वर एकाध कविता .......
बाप रे ...मी डोळेच का उघडले ह्याचा शोध घेत होते ....आणि त्या रवीचा ह्या कवीशी काय संबंध आहे तो ? ते जाणून घ्याया लागलो ....
आता कुठल्याही क्षणी कविता कर अस म्हणणे म्हणजे सुलभ मध्ये बसून आर्त भैरवी गाण्यासारखे आहे .....
म्हणजे जवळ पास शक्यच नाही ....
एकाध वेळ काहींनाच जमते असे आहे ते .....
तरी नाही नाही म्हणता मला माझ्या भाच्या समोर .....माझी सारस्वत अशी प्रतिमा बनवायची असल्या कारणाने ....मी काही एक ओळी केल्या
उगवतीच्या ठिकाणी मी त्याला जवजवळ मावळूनच टाकले .....
बघ हा नीट लक्ष दे ,आणि तसे ते दुसरी मराठी इयत्ता शिकणारे मुल माझे कवन ऐकू लागले ....
"हा सूर्य मावळतीचा
क्षणार्धार्त लांबला
डोईवरुनी गेला अन
सागरात विसावला ,,,"
इतक्यात हा ....," मामा मी सूर्य उगवण्याची बोलत होतो ....."
आताचे शालेय मुले हि इतकी चाप्टर असतील ह्याची मला इत्यंभूत प्रचीती आली ...
अरे पुढे तरी ऐक ....
" त्याच्या त्या उष्ण झळा ही
झाल्या शिथिल संध्याकाळी
रात्रीची पांघरून शाल
पुन्हा सकाळी उगवला ...."
बघ उगवला ना ......? मी आपला उगाच प्लासी ची लढाई जिंकल्यासारख तोंड करून बोललो ... तर ते ही आभार प्रदर्शन करण्यासाठी मांडीवर झोपलं.
चला माझ एक काम तर झालं ...
शब्द देखील कधी दगा देतील याची काही वेळ नाही .....तुम्हाला सांगतो ... रजा घेण्यासाठी मायना नक्की काय लिहावा ह्यात कमीत कमी दोन अडीच तास घालवणारा मी ...... तिच्यासमोर मेघदुतातला कालिदास बनतो ..... तसे पत्र लेखन वाईट नाही माझे पण ....अजून एकही पत्राचा होकारात उत्तर आलेच नाही...... अगदी त्याही .....
परवाच शाळेतून मेल आला होता , कि यंदा शाळेतल्या काव्यसंमेलनासाठी माझा पदस्पर्श व्हावा ........
बापरे .... पदस्पर्श ..??? तो नक्की कुणी केला होता हे जेव्हा विचारले तेव्हा कळले की , सातवीतल्या एका मऱ्हाटी बहाद्दराने ते उतरवले होते ....
सातवी च्या मुलांना आता बाबासाहेब पुरंदरे ... वगैरे चांगलेच तोंडवळणी पडले होते ...म्हणून पदस्पर्श ....
मी न रहावता उत्तरात लगेच लिहून टाकले ' मी आज पर्यंत शाळेतल्या खालच्या पायरी पासून ते गच्चीच्या माळ्यापर्यंत सगळी कडे पदच काय तर थंडीत पार्श्व भागाचे ठसे देखील उमटवून आलोय .., तर पदस्पर्श वगैरे ते काय ...? नक्की हजर राहणार ....'
झालं चला दुसर एक काम झालं ......
आता त्या दिवशी अध्यक्षीय भाषण मग आपलं नवकवी भाषण म्हणून आजच्या कविता कशा छान आहेत वगैरे वगैरे लिहून आणलेले बोलू लागलो ,
तर इतक्यात उपस्थित म्हातारबुवा म्हणजेच त्या वेळचे नवकवी ह्यांनी मला हटकले ....
की आमच्या काळच्या कविता कश्या यतार्थ होत्या हे पटवून देण्या साठी त्यांनी अक्षरशः माझ्या हातातून माईक हिसकावून घेतला .....
मी म्हटले हेच काम ह्यांनी त्यांचा अगोदर त्या वेळीही केले असणार .....' काय करू काही दर्दी कवी असतातच इतके आग्रही ...'
तरी मग त्यांचा आम्ही ऐकून घेतले कारण त्यांनी तेच मुद्दे प्रस्तुत केले जे मी तिथे प्रसुतनार होतो ...
प्रत्येक संमेलनात हे असे काही तरी वादग्रस्थ झालेच पाहिजे हे म्हणजे काळ्या दगडावरील रेघच ...
बरे आता पर्यंत सगळे ठीक होते पुढच्या प्रश्नोत्तरातील फेरीत माझी गोचीच होणार होती इतकं नक्की ...
कारण आतापर्यंत माईक चा ताबा घेणारे प्रस्थापित साहित्यिक आता स्नेहभोजन आटोपण्यासाठी जाणार आणि इथे मी ह्या फेरीत मरणार ....हे ही विधीलेखीत ....
समोर बसलेल्या एका आठवी नववीतल्या मुलीने मला प्रश्न केला ...
" काका , तुम्ही वर्गात बसताना अभ्यास करायचे का कविता ...?"
आता तिने मला काका म्हणणे म्हणजे अगदी कहरच ,
पण तो कहर चेहऱ्यावर न दाखवता मी शांतपणे म्हणालो ," पोरी मी वर्गात असताना तुझ्या सारख्या सुंदर पोरींवर कविता करायचो "
आता ती ही जराशी वरमली होती , इतक्यात नेहमी टारगट ह्या गटात मोडणाऱ्या मुलाने उठून प्रश्न केला,
'' दादा , मी काय म्हणतो कविता लिहायची म्हणजे कशी रे ...?"
जरा हायसे वाटले .....,"
" अरे हाताने पेन धरायचा आणि मनाने शब्द रेखाटायचे .. झालं की मग तुझी कविता ..."
आणखीन एक गटणे ह्या प्रकारात मोडणारा रसिक मुलगा उभा राहिला आणि म्हणाला ," कविवर्य "
मुळात आता हा पुढे काय बोलणार ह्याची मी पु लं ना वाचून तयारी केलीच होती ....
तर हा ," कविवर्य , माझ्या साहित्य जीवनात मी तुमची बरीचशी पुस्तके वाचून काढल्या नंतर असे आढळून आले की आपण बहुदा प्रेमकाव्य जास्त लिहिले आहे ...तर इतर कविता आम्हास कधी वाचावयास मिळतील...?"
मी पुरता ठार झालो ह्या विधानाने ....म्हणजे माझे पुस्तक मी अजून काढले नाही आणि ह्याने ते वाचूनही काढले म्हटल्यावर गटणेचा बाप कोण ? ह्याचे उत्तर साक्षात हाच .....
" अरे मित्रा माझ्या ओर्कुट आणि फेसबुक वरील कविता वाच म्हणजे तुला कळेल की मी फक्त प्रेम काव्य वगैरे लिहित नाहीच मुळी ....आणि इतर कविताही तिथेच आहेत तू नक्की पहा ..."
ह्यात त्याला काय हर्ष झाला कुणास ठाऊक .... ते उगाच उडी मारून जागेवर बसलं .....
आता पर्यंत येणाऱ्या जवळजवळ सर्वच प्रश्नातले हे काही निवडक प्रश्न होत ..बाकीचे तुम्ही विचारू नका कारण मुद्द्याबाहेर सहसा मी बोलत नाही आणि लिहितही नाही .....
एक प्रमुख प्रश्न जो मला प्रकर्षाने जाणवला आवडला तो म्हणजे
" मी नाशकात अगदी शिरवाडकरांच्या तसेच मुंबईला पु लं च्या आणि त्या त्या ठिकाणी त्यांच्या त्यांच्या ठिकाणी जाउन तिथे कविता लिहिण्याचा प्रयास केला ...
पण ते शक्य नाही झाले असे का होते ..?"
मला क्षणभर हसूच आले .... हे म्हणजे मारुतीच्या देवळात गेल्यावर बारा हत्तींच बळ अंगात येते असे म्हणण्यासारखे ,
तरीही त्या भाबड्या प्रश्नाला त्याच्या निरागसतेचा लेप होता ....
मुळात ह्यावर मी ही काय ते उत्तर देऊ शकणार होतो देव जाणे .....
...........................................................................................................
जरा २ ३ मिनिटांनी मी प्रयत्न केला ...." बघ हा कसे असते .... आपण ज्यांच्या ठिकाणी जातो त्या माणसांना अनुभवण्यासाठी ....त्यांचे विचार त्यांचे आचार समजण्यासाठी किव्वा आपल्यात भिनवून घेण्यासाठी ...
म्हणून मुळात आपण त्यांच्याच सारखे लिहू शकू हे काही शक्य नाही .. कवितेला, विचारांना मुळात स्थळ ,काळ, वेळ, पंचांग आणि मुळात म्हणजे ग्रहांची दशा अनुकूल नसतेच कधी ..
ते कधी तुमच्या सुपीक डोक्यातून बाहेर पडतील तुम्हालाच कळणार नाही ...... त्या साठी फक्त मनाचा गाभारा मोठा करा ......म्हणजे विचार आपोआप तिथे वास करू लागतील शब्द राज्य करू लागतील .....
माझी आई म्हणते,' आपण झोपतो म्हणजे आपल्यातला आत्मा आपण मोकळा करतो ..स्वप्न म्हणजे आपल्या आत्म्याने इहलोकात केलेलं भ्रमण असते ....आणि तो जसा आपल्या शरीरात पुन्हा शिरतो तेव्हा आपल्याला जाग येते ....' तर कविता, लेख हे असेच आपल्या आत्म्याने केलेला आपल्याशी संवाद असतो ... तो तुम्ही मुद्दाम घडवून आणू शकत नाही .. त्या साठी मनाची अवस्था निर्माण व्हाही लागते .....मग तुम्हाला आपोआप सारे काही लिहिता येईल अगदी भागवत गीता देखील !!, ती ही कधीच न वाचता......... कारण त्यातच लिहिलंय आत्मा अमर आहे तो इहलोकात कुठे ही कधी जाऊ शकतो .....मग तुम्ही ती वाचली असो किव्वा नसो त्याचे विचार आत्मा तुमच्या पर्यंत खेचून आणेलच ....कविता ही जशी अवस्था असते तशीच ती व्यक्त करण्याची म्हणजेच लिहण्याची व्यवस्था तुमच्यात असावी लागते ....
जरा माझ्या ह्या त्रिवेणीत विशेष लक्ष द्या बर्र का ....
' का लिहाया लागलो कळलेच नाही
कधी लिहाया लागलो तेही कळले नाही .....
..
.
.
.
कवी होणे हातातल्या रेषेत नसते लिहिलेले ...'
म्हणून म्हणतो नुस्त स्वप्नात जगण म्हणजे काव्य करणे नाही ते लिहून ते इतरांपर्यंत पोहचवण हे देखील महत्वाचे ....
म्हणून तू जे काही प्रयत्न केलास तो भौतिक होता, तू आत्मिक प्रयत्न कर जागेवरच तुला पु लं आणि शिरवाडकर नक्कीच हातात हात घालून भेटतील ...
मुन्नाभाईच्या गांधी सारखे .......... कारण त्या साठी तो रोग ही स्वतःला जडवून घ्यावा लागतो रे .... काय म्हणतात तो .....केमिकल लोचा ..."
आणि संमेलन तूर्तास संपले ..............
;- सुजित ( धवल ध्रुव )
Friday, December 24, 2010
Tuesday, November 16, 2010
कारण ती वेळच तशी होती ...
आज तुला तिथेच
पुन्हा तिथेच बसायचे होते ....
अगं आज तिथे कुणी दुसरे जोडपे बसलेय ...
नाही मला तिथेच बसायचेय .....
मग काय गेलो तिथे आणि
खरच उबळ आल्यागत केले ..
बिचारे नुसतेच घाबरून
अगदी लांब पळाले...
तू ना खूप खूप जिद्दी आहेस बघ ....
रोमेंटिक बघा हा ....
त्या दगडावर फक्त एकालाच
आणि एकालाच टेकवता येईल
अशी इतकीच जागा ..
मी बसावं मग तिने मांडीवर ...
आणि समोर अथांग सागर .....
तिला खांद्याने धरून मी उगाच
माझ्या कविता ऐकवायच्या ...
तिने हि न ऐकताच नुसत्याच
वाह वाह म्हणायचं ...!!!
ती तर नुसती माझ्यात गुरफटलेलीच असायची ......
इतके होत असताना
कधी नव्हे तो आज डोक्यात
एक ठिणगी पेटली ...
तिचे ओठ पाहून
माझेही ओठ आपसूकच सरसावले ...
बस्स एकदाच
कारण फक्त ठिणगी पेटली होतीना
आग नव्हती लागली ना ..
पण त्या दिवशी संद्याकाळी
तिला घरी सोडले आणि
पुन्हा बाय करायला गेलो तर ...
ती तिच्या मैत्रिणीसोबत बोलत होती ....
" अग आज १ किस झाली ग ...
तिथून - काय म्हणतेस मग पुढे काही .....?
हि- नाही ग तसे काहीच नाही .....
-अग काय ग मग कुठे एकांतातच जायचं ना ...
हि - अग पण तो बावरला ना ,.. मग काय आले घरी परत ...."
जरास्स बर वाटलं अन नाहीही ....
ती याच क्षणाची वाट बघत होती ....
पण मी नुसताच बावरलो ...
कारण ती वेळच तशी होती ...
तिने मला बघून प्रेम केले कि
नुस्त माझ पौरुष्य पाहिले...
स्त्री म्हणून तिने मला
पुरतेच मदहोश केले .....
आता नाहीच वाटत
तिला पुन्हा भेटावासं
आणि जाहलेल्या आठवणी
नुस्त आठवांवासं ....
कारण मी वासना
कधीच उफाळली नव्हती
नुस्त आणि नुस्त
निर्मळ प्रेम केले होते ....
:- सुजित ( धवल ध्रुव )...
पुन्हा तिथेच बसायचे होते ....
अगं आज तिथे कुणी दुसरे जोडपे बसलेय ...
नाही मला तिथेच बसायचेय .....
मग काय गेलो तिथे आणि
खरच उबळ आल्यागत केले ..
बिचारे नुसतेच घाबरून
अगदी लांब पळाले...
तू ना खूप खूप जिद्दी आहेस बघ ....
रोमेंटिक बघा हा ....
त्या दगडावर फक्त एकालाच
आणि एकालाच टेकवता येईल
अशी इतकीच जागा ..
मी बसावं मग तिने मांडीवर ...
आणि समोर अथांग सागर .....
तिला खांद्याने धरून मी उगाच
माझ्या कविता ऐकवायच्या ...
तिने हि न ऐकताच नुसत्याच
वाह वाह म्हणायचं ...!!!
ती तर नुसती माझ्यात गुरफटलेलीच असायची ......
इतके होत असताना
कधी नव्हे तो आज डोक्यात
एक ठिणगी पेटली ...
तिचे ओठ पाहून
माझेही ओठ आपसूकच सरसावले ...
बस्स एकदाच
कारण फक्त ठिणगी पेटली होतीना
आग नव्हती लागली ना ..
पण त्या दिवशी संद्याकाळी
तिला घरी सोडले आणि
पुन्हा बाय करायला गेलो तर ...
ती तिच्या मैत्रिणीसोबत बोलत होती ....
" अग आज १ किस झाली ग ...
तिथून - काय म्हणतेस मग पुढे काही .....?
हि- नाही ग तसे काहीच नाही .....
-अग काय ग मग कुठे एकांतातच जायचं ना ...
हि - अग पण तो बावरला ना ,.. मग काय आले घरी परत ...."
जरास्स बर वाटलं अन नाहीही ....
ती याच क्षणाची वाट बघत होती ....
पण मी नुसताच बावरलो ...
कारण ती वेळच तशी होती ...
तिने मला बघून प्रेम केले कि
नुस्त माझ पौरुष्य पाहिले...
स्त्री म्हणून तिने मला
पुरतेच मदहोश केले .....
आता नाहीच वाटत
तिला पुन्हा भेटावासं
आणि जाहलेल्या आठवणी
नुस्त आठवांवासं ....
कारण मी वासना
कधीच उफाळली नव्हती
नुस्त आणि नुस्त
निर्मळ प्रेम केले होते ....
:- सुजित ( धवल ध्रुव )...
नऊ रात्र..............
हार्दिक आज गरबा खेळायला येणार ना रे .............?
म्हणून तिने अवचितच फोन केला ...
ह्यानेही हा म्हणून मोठा सुस्कारा सोडला .....
क्षणभर काहीच कळले नाही हे असे का ते .......
गरबा इतका आवडू लागला
आमच्या मराठी मुला मुलींना ??
काय बाई देवीचीच कमाल ......
रात्री ११ नंतर सुरु व्हायचा गरबा यांचा ....
रास रंगायचा रास बहरायचा ..
सगळे जोडीने खेळायचे ....
दमायचे मग आपापल्या जोडीदारासोबतच
थोडी विश्रांती घ्यायचे जोडीदारासोबतच...
हा हार्दिक तर नऊ रात्र नऊ जोडीदारांसोबत ....
भारी गरबा इंटरेस्टिंग वाटू लागला
आणि मग आमचाही पाय निघू लागला .....
जशी रात्र गडद झाली .....
जोड्या हळू हळू पांगू लागल्या ....
आतापर्यंत मंडळात खेळणारे हात
आता मेडिकल स्टोर शोधू लागले ....
गाड्या भरत राहिल्या
निघाल्या मात्र कुणीच नाही .....
गाड्या नुसत्या हलू लागल्या
ए सी ने नुसत्याच घाम भरू लागल्या ..
बाईक वाले अंधारात गडप ......
पण आवाज मात्र करू लागल्या .....
झाले निघाले सगळे घरी आता ......
काल रात्री गरबा फारच छान रंगला होता ..
पूर्वार्धात आणि उत्तराधार्त ...
सकाळी हार्दिक च्या आईला
त्याच्या कुडत्यात कोंडमचे पाकीट सापडले
तो घाईत विसरलाच होता .......
आता कळले नऊ रात्र हा हार्दिक काय करत होता ........??
:- सुजित ( धवल ध्रुव )
म. सु :- १ ) वरील लेखातील / काव्यातील " हार्दिक " हे पात्र पूर्णपणे काल्पनिक दोष आहे , त्याचा कुणीही स्वतःशी संबंध जोडू नये ...
२) काय आहे!! उगाच गरबा खेळल्याने अथवा रमल्याने देवी पावत नाही ...... ती कशी पावते ..ते इथे कळलेच असेल ...
३) म्हणून एक दोन इट्स ओके पण सवय गरज झाली तर हार्दिक तुम्हीही व्हाल .....म्हणून या 'हार्दिक' नावाच्या पात्राशी सावधान .....!!!
४ ) चूक भूक द्यावी घ्यावी ...
ईssस्टाइल
बाब्या चवथीला होता
तेव्हा त्याने जराशी उष्टी बिडी सुलगावली होती ....
आज बाब्या चार पाकीट संपवतो ...
ते हि अगदी ईssस्टाइल मध्ये ...
आता बाब्याला काय सवय होतीच असे नाही
पण हे ओढताहेत ते ओढताहेत म्हणून
आपसूकच परंपरागत ते बाब्याकडे आले
ते हि अगदी ईssस्टाइल मध्ये ...
म्हणाल तर बाब्याला अजून मिस्रूढ फुटली नाही
आणि खालचं म्हणजे चपलेच माप हि
बापाएवढं झालं नाही , तरी त्याच्यासमोर हा ओढतो
ते हि अगदी ईssस्टाइल मध्ये ...
क्रीतेक समजावून गेले
क्रीतेक त्याच्यात सामील झाले ....
कोणासमोर कधी किती आणि कशी ओढावी ते हि शिकताहेत
ते हि अगदी ईssस्टाइल मध्ये ...
बाब्या इथेच नाही थांबला
त्याने तर दुसरी हि बया केली आहे जवळ
रोज चार खंबे हवे असतात याला म्हणे स्वर्ग सुख
ते हि अगदी ईssस्टाइल मध्ये ...
आता विचार कराल एवढ्या सार्या साठी पैका
येतो तरी कुठून , अरे कुठून काय विचारताय
राजकारणी,मवाली, गुंड ह्यांच्यासारख्यांच्या तिजोरीतून ...
ते हि अगदी ईssस्टाइल मध्ये ...
बाब्या म्हणे आजकाल एरियाचा झाला आहे भाई !!
.
.
.आता काय त्यालाही सलाम करायचा
ते हि अगदी ईssस्टाइल मध्ये ...
:- सुजित ( धवल ध्रुव)
म. सु :- १ ) वरील लेखातील / काव्यातील " बाब्या" हे पात्र पूर्णपणे काल्पनिक दोष आहे , त्याचा कुणीही स्वतःशी संबंध जोडू नये ...
२) काय आहे!! उगाच बिडी सिगारेट दारू घेतल्याने ....तिचा नुसता खप होतो ... आणि आपल्या आयुष्याचा वेगवान खप होतो ....
३) म्हणून एक दोन इट्स ओके पण सवय गरज झाली तर बाब्या तुम्हीही व्हाल .....म्हणून या 'बाब्या' नावाच्या पात्राशी सावधान .....!!!
४ ) चूक भूक द्यावी घ्यावी ...
Monday, October 4, 2010
( वाय टू के ) नवीन जनरेशन
राउंड मारून येतो म्हणून आईला त्याने फसवले ....
दळण आणायचे सोडून तो तिला भेटायला गेला ...
क्लास तर कधीचाच संपला होता....
हि अजून कशी आली नाही ?
होता होता राउंड याचा खूप वेळ घेउ लागला ...
६.३० ला गेलेला हा अजून कसा नाही आला ?
म्हणून आई इथे काळजीत .....
आणि हा तिच्या .........
गेल्या वर्षी नापास झाला
आणि याच वर्गात बसला
मित्रांनी विचारले तर म्हणाला
अरे हि नाही का आता रोज दिसणार वर्गात ?
नापास होण्याचा आनंद ह्याला इतका काही झाला ....
कि साला रडायाचे सोडून हा तर पार्टी देऊ लागला ....
काही का होईना त्याचे नापास होणे फळले ....
आणि उशिरा का होईना पास झालेले सारे जन जळले ....
रोज हा तिच्या सोबत गणितं सोडवत बसायचा ..
विज्ञान वगैरे विचारू नका हा तर प्रात्यक्षिक हि द्यायचा ...
हळू हळू दोघानांही विज्ञान जरा जास्तच लागले कळू
आणि मग पौगंडावस्था यांनाही लागली फळू ...
..
..
..
एकदा ..
..
मधल्या सुट्टीत एकाने
बाथरूम मध्ये पाहिले ह्यांचे प्रात्यक्षिक
आणि काही कळायचे तर सोडा
हा घाबरून पळत सुटला प्रासंगिक
जाउन त्याने मास्तरांना सांगितले
आणि मास्तरांनी हि दोघांना विचारले ...
समित्या बसल्या .. वोटिंग झाले ....
बिचारे दहावी अगोदरच पास झाले ....
मग काय आता ह्यांचे भेटणे
कुणालाही रास्त नाही ..
दोघांनाही कळले कि करावे पण
लिमिट पेक्षा जास्त नाही .....
:- सुजित ( धवल ध्रुव )
Monday, September 20, 2010

अन उद्याची भेट पुन्हा....
/
ठरवले होते कि चला
आज आठवणीच्या गावा जावे
अन उद्याची भेट पुन्हा
आजच्या जगण्यात ल्यावे ...
सापडतील तिथे तुला
तुझा पहिला वहिला मित्र
झोपाळ्याचा दोरखंड आणि
आट्यापाट्याचे छत्र
थोडे पुढे गेलास कि
शाळा असेलच उघडी
मास्तरांच्या टेबलावरली
लपवशील तू पुन्हा छडी
पटांगणात आल्यावर
आठवेल सकाळचा पाढा
सूर्य नमस्कार आणि
गार वाहणारा तो ओढा
लिंबाखाली बस जरा
तात्या , बुधाजी दिसतील
तुझ्या नव्या अवताराला
कुणब्याच्या पोरी हसतील ...
आडाजवळ ये आता
तो पूर्वीसारखा खोल नसेल
मोट त्याची कधीच काढलेली
अन नुसतीच फिरती रहाट दिसेल ...
मारुतीकड आलास तर
जरा आठव पैलवानकीचे धडे
अन हनम्या मुलाम्याला हरिवलास
तेव्हा खाल्लेले खव्याचे पेढे
माळाकडं फिर आता
उस उभा असल तसाच तवा
नारुश्याची कमळी पहिल्यांदा
थंडीत बिलगली होती जवा
दुपार टळून जाईल
आता घराकडे फिर
जोश्याच्या घरात चा घे
अन मोमिनच्या घरात खा खीर ..
सांज सरून गावकरी
जेव्हा घराकडे येतील
छुन छुन पैंजणाने मग
जीव शिवा परततील ..
दिसलं चांदण मुलखाच
अन चांदण्याबी भारी
अरं गाव सोडून शहरामंदी
नसते जीवन वारी ......
:- सुजित ( धवल ध्रुव )
ठरवले होते कि चला
आज आठवणीच्या गावा जावे
अन उद्याची भेट पुन्हा
आजच्या जगण्यात ल्यावे ...
सापडतील तिथे तुला
तुझा पहिला वहिला मित्र
झोपाळ्याचा दोरखंड आणि
आट्यापाट्याचे छत्र
थोडे पुढे गेलास कि
शाळा असेलच उघडी
मास्तरांच्या टेबलावरली
लपवशील तू पुन्हा छडी
पटांगणात आल्यावर
आठवेल सकाळचा पाढा
सूर्य नमस्कार आणि
गार वाहणारा तो ओढा
लिंबाखाली बस जरा
तात्या , बुधाजी दिसतील
तुझ्या नव्या अवताराला
कुणब्याच्या पोरी हसतील ...
आडाजवळ ये आता
तो पूर्वीसारखा खोल नसेल
मोट त्याची कधीच काढलेली
अन नुसतीच फिरती रहाट दिसेल ...
मारुतीकड आलास तर
जरा आठव पैलवानकीचे धडे
अन हनम्या मुलाम्याला हरिवलास
तेव्हा खाल्लेले खव्याचे पेढे
माळाकडं फिर आता
उस उभा असल तसाच तवा
नारुश्याची कमळी पहिल्यांदा
थंडीत बिलगली होती जवा
दुपार टळून जाईल
आता घराकडे फिर
जोश्याच्या घरात चा घे
अन मोमिनच्या घरात खा खीर ..
सांज सरून गावकरी
जेव्हा घराकडे येतील
छुन छुन पैंजणाने मग
जीव शिवा परततील ..
दिसलं चांदण मुलखाच
अन चांदण्याबी भारी
अरं गाव सोडून शहरामंदी
नसते जीवन वारी ......
:- सुजित ( धवल ध्रुव )
मी गेल्यावर
मी गेल्यावर इतरांसारखा
तू हि रडू नकोस .
सगळे इथे जमले तरी
तू मात्र आहेस तिथेच राहा ..
आपला एकाधा जुना फोटो पहा आणि हस ...!!
इथे माझ्या अंतयात्रेला देखील येउ नकोस ....
कारण तेव्हाही तुझा विरह
सहन नाही होणार मला .....
आलेच जरका डोळ्यातून तुझ्या अश्रू
तरी मी पुसतोय अस समज ...
कारण माझ्या डोळ्यातील अश्रू पाहून
ते देखील लगेच जातील ..
राखे साठी आलास तर ...
फक्त लांबून मला पहा ...
विजल्यावर भरून घे सगळे
..घटात ...
गंगेत सोडल्यावर हर हर म्हणू नकोस ....
मला मोक्ष नकोय ..
तुझ्या सोबत पुन्हा जगावे
म्हणून
देवाला सांगून येतोय ....
माझ्या मित्रा !!!
:- सुजित ( धवल ध्रुव )
तू हि रडू नकोस .
सगळे इथे जमले तरी
तू मात्र आहेस तिथेच राहा ..
आपला एकाधा जुना फोटो पहा आणि हस ...!!
इथे माझ्या अंतयात्रेला देखील येउ नकोस ....
कारण तेव्हाही तुझा विरह
सहन नाही होणार मला .....
आलेच जरका डोळ्यातून तुझ्या अश्रू
तरी मी पुसतोय अस समज ...
कारण माझ्या डोळ्यातील अश्रू पाहून
ते देखील लगेच जातील ..
राखे साठी आलास तर ...
फक्त लांबून मला पहा ...
विजल्यावर भरून घे सगळे
..घटात ...
गंगेत सोडल्यावर हर हर म्हणू नकोस ....
मला मोक्ष नकोय ..
तुझ्या सोबत पुन्हा जगावे
म्हणून
देवाला सांगून येतोय ....
माझ्या मित्रा !!!
:- सुजित ( धवल ध्रुव )
मी येतोय ....
कशाला आलात
या भुतांच्या स्मशानात ....??
काय , मला शेवटचे पाहण्यासाठी ?
का आलात आठवणीच्या पुसण्या भेटी गाठी ?
खरं संग आज तुझ्या मनात काय आहे ?
तू हेच म्हणत आहेस ना कि ,'' मेल्या आता तरी मर ...
जिवंतपणी जगू दिले नाही , मेल्या आता तरी मर ."
अगं जिवंत असताना तुझ्या आठवणीने जळत होतो
आता मेल्यावर सरणावर जळत आहे
जिवंत असताना तरी तुझी भेट झाली नाही
आता मात्र ती पूर्ण होणार आहे ......
आज इतकाच फरक आहे
तू जिवंत , मी मेलेलो आहे
तुझ्या हाती बाळ
माझ्या मागे काळ आहे .....
जा सुखी रहा !!
आपला संसार पहा
देवाकडे जाईन आणि म्हणेन
" देवा का रे असा कोपलास माझ्यावर
का नाही केलेस मला तिचा उपवर "
अरे तूच मला निर्माण केले
तूच तिला निर्माण केले
मग कोणत्या फरकाने
आम्हाला वेगळे केले ?
तुझा मात्र विजय झाला
माझी मात्र राख झाली !!"
पुढच्या जन्मात पुन्हा तुझ्या
वाटेवर उभा असेन मी
आताच्या तुझ्या नवऱ्याला
सात जन्म मागे ढकलेन मी ....
फक्त तू तयार रहा
मी येतोय .....मी येतोय .....मी येतोय ....||
:- सुजीत शिंदे ....(धवल ध्रुव)
या भुतांच्या स्मशानात ....??
काय , मला शेवटचे पाहण्यासाठी ?
का आलात आठवणीच्या पुसण्या भेटी गाठी ?
खरं संग आज तुझ्या मनात काय आहे ?
तू हेच म्हणत आहेस ना कि ,'' मेल्या आता तरी मर ...
जिवंतपणी जगू दिले नाही , मेल्या आता तरी मर ."
अगं जिवंत असताना तुझ्या आठवणीने जळत होतो
आता मेल्यावर सरणावर जळत आहे
जिवंत असताना तरी तुझी भेट झाली नाही
आता मात्र ती पूर्ण होणार आहे ......
आज इतकाच फरक आहे
तू जिवंत , मी मेलेलो आहे
तुझ्या हाती बाळ
माझ्या मागे काळ आहे .....
जा सुखी रहा !!
आपला संसार पहा
देवाकडे जाईन आणि म्हणेन
" देवा का रे असा कोपलास माझ्यावर
का नाही केलेस मला तिचा उपवर "
अरे तूच मला निर्माण केले
तूच तिला निर्माण केले
मग कोणत्या फरकाने
आम्हाला वेगळे केले ?
तुझा मात्र विजय झाला
माझी मात्र राख झाली !!"
पुढच्या जन्मात पुन्हा तुझ्या
वाटेवर उभा असेन मी
आताच्या तुझ्या नवऱ्याला
सात जन्म मागे ढकलेन मी ....
फक्त तू तयार रहा
मी येतोय .....मी येतोय .....मी येतोय ....||
:- सुजीत शिंदे ....(धवल ध्रुव)
झाली चूक! क्षमस्व !!
झाली चूक! क्षमस्व !!
वेड असले जन्मांतुनी लागते
कोणाला कधी , कोणाला कशाचे
ते का कधी कुणाला सांगता येते ? ||
मनाचा व्यवहार फसवा नसतो
आणि लागलेले वेड उतरत नसते ||
भटकत फिरलो भणंग आणिक
मिळेल तेथे पाणी प्यालो
अशा काही रात्री गेल्या
ज्यात काळवंडलो असतो
अशा काही वेळा आल्या
होतो तसा उरलो नसतो......||
आणि प्रेम झाले .................;
ते नेहमी अबोधच राहते
अनेकांना काय , बहुतेकांना
त्यात नकारच मिळतो .....||
मग अश्यावेळी आधार देतात
ती जीर्ण शीर्ण झालेली पत्रे
एका पावसाळ्यात लिहिलेली हि असंख्य प्रेमपत्रे
प्रीतीच्या वर्षावात भिजलेले अनंत आर्द्र शब्द ...
हि न संपणारी आश्वासने
कोसळताना दिलेला धीर
कसे निभावून गेलो
कळत नाही, कळत नव्हते
फक्त तुझी आठवून राहावी म्हणून
तेच माझे प्रेमपत्र होते ................!!!
:- सुजीत शिंदे ....(धवल ध्रुव)
वेड असले जन्मांतुनी लागते
कोणाला कधी , कोणाला कशाचे
ते का कधी कुणाला सांगता येते ? ||
मनाचा व्यवहार फसवा नसतो
आणि लागलेले वेड उतरत नसते ||
भटकत फिरलो भणंग आणिक
मिळेल तेथे पाणी प्यालो
अशा काही रात्री गेल्या
ज्यात काळवंडलो असतो
अशा काही वेळा आल्या
होतो तसा उरलो नसतो......||
आणि प्रेम झाले .................;
ते नेहमी अबोधच राहते
अनेकांना काय , बहुतेकांना
त्यात नकारच मिळतो .....||
मग अश्यावेळी आधार देतात
ती जीर्ण शीर्ण झालेली पत्रे
एका पावसाळ्यात लिहिलेली हि असंख्य प्रेमपत्रे
प्रीतीच्या वर्षावात भिजलेले अनंत आर्द्र शब्द ...
हि न संपणारी आश्वासने
कोसळताना दिलेला धीर
कसे निभावून गेलो
कळत नाही, कळत नव्हते
फक्त तुझी आठवून राहावी म्हणून
तेच माझे प्रेमपत्र होते ................!!!
:- सुजीत शिंदे ....(धवल ध्रुव)
घेता अमृताचा प्याला...
ऐसे जाहिले सर्व
जैसे न होते आधी
घेता अमृताचा प्याला
जडल्या जगण्याच्या व्याधी ||
म्हणे देवा मला
मरण नको देऊ रे
अन तरी सुद्धा मला
स्वर्ग सुख लाभू दे ||
मी करीन रोज पाप
तरी मला माफ कर
हंडा जरी भरला पूर्ण
तरी थोडा साफ कर ...||
अरे बायको द्यायची तर दे
पण जरा माझाही विचार कर
निघेल चांगली याची दे ग्वाही
नाहीतर देशील तशी परत कर ..||
एक असावा बंगला
नुसता सोन्याचा महाल
अन ऐशोआरामाची
असावी तिथे धमाल ..||
अजून काय ...??
ह ..गाडीतर कि राहली ..!!
मस्त उडणारी दे
जशी कुणी नाही पाहिली ...||
आता संपले का वरदान सारे ?
कि अजून काही बाकी आहे ..
जाऊ दे आठवत नाही आता काही
तू हि जरा ब्रेक घे ......||
:- सुजित ( धवल ध्रुव )
जैसे न होते आधी
घेता अमृताचा प्याला
जडल्या जगण्याच्या व्याधी ||
म्हणे देवा मला
मरण नको देऊ रे
अन तरी सुद्धा मला
स्वर्ग सुख लाभू दे ||
मी करीन रोज पाप
तरी मला माफ कर
हंडा जरी भरला पूर्ण
तरी थोडा साफ कर ...||
अरे बायको द्यायची तर दे
पण जरा माझाही विचार कर
निघेल चांगली याची दे ग्वाही
नाहीतर देशील तशी परत कर ..||
एक असावा बंगला
नुसता सोन्याचा महाल
अन ऐशोआरामाची
असावी तिथे धमाल ..||
अजून काय ...??
ह ..गाडीतर कि राहली ..!!
मस्त उडणारी दे
जशी कुणी नाही पाहिली ...||
आता संपले का वरदान सारे ?
कि अजून काही बाकी आहे ..
जाऊ दे आठवत नाही आता काही
तू हि जरा ब्रेक घे ......||
:- सुजित ( धवल ध्रुव )
तुझी सावली हि वाढली ........
रात्र होती थांबलेली
अन वाराही नव्हता कुठे .........
तुला जळताना पाहताना
नुसता माझ्या भावनांचा पसारा होता तिथे ...................
एकच होतास तू
तुला जोड कुणाची द्यावी ..........
घडवले माझे मला
तुझी ओढ कशी रे जावी ........
लहान होतो तेव्हा
तुझी पावलं मला दिली
जसा झालो जरासा मोठा
तुझी सावली हि वाढली ........
नुसता बिलगायचो तेव्हा
हळूच कुज्बुजायाचा
खेळताना तुही तेव्हा
खूप खूप चिडायचा ...
पावसात जेव्हा भिजायचं तू
तेव्हा कुठे आंघोळ केल्या सारखा वाटायचा
नवी वस्त्रे वागवायचा
सुमधुर पसरायचा ..........
अरे मीच काय तुझ्यासाठी
माझे सारे सवंगडी
जरी तू नाही खेळसी
तरी तुझ्या भोवती खेळती लंगडी ......................
असा जरा मोठा झालो
आता नाही भेटत तुला .............
तरी कधी जरा विसावतो रे
घे सामावून तुझ्या सावलीत मला ...............
आता कुणाच्या सावलीत
सांग उभा राहू
हिंडोळ्याचे झोके
सांग कसे घेऊ ...............
तेव्हा कुठे आज असे खरे पटले .....................
"मनुष्य हि जगातली सर्वात हिंस्त्र आणि वाईट जात आहे ............."
:- माझे घरामागचे झाड जेव्हा जाळले गेले कुणा बिल्डर च्या जागेपायी ............खरच तेव्हा मनुष्य वधाचा गुन्हा लागू झाला त्यावर ...........( पण तो सुटला दुसरे झाड लाऊन ....माझे झाड मला पुन्हा मिळणे नाही ...........)
सुजित ( धवल ध्रुव )
अन वाराही नव्हता कुठे .........
तुला जळताना पाहताना
नुसता माझ्या भावनांचा पसारा होता तिथे ...................
एकच होतास तू
तुला जोड कुणाची द्यावी ..........
घडवले माझे मला
तुझी ओढ कशी रे जावी ........
लहान होतो तेव्हा
तुझी पावलं मला दिली
जसा झालो जरासा मोठा
तुझी सावली हि वाढली ........
नुसता बिलगायचो तेव्हा
हळूच कुज्बुजायाचा
खेळताना तुही तेव्हा
खूप खूप चिडायचा ...
पावसात जेव्हा भिजायचं तू
तेव्हा कुठे आंघोळ केल्या सारखा वाटायचा
नवी वस्त्रे वागवायचा
सुमधुर पसरायचा ..........
अरे मीच काय तुझ्यासाठी
माझे सारे सवंगडी
जरी तू नाही खेळसी
तरी तुझ्या भोवती खेळती लंगडी ......................
असा जरा मोठा झालो
आता नाही भेटत तुला .............
तरी कधी जरा विसावतो रे
घे सामावून तुझ्या सावलीत मला ...............
आता कुणाच्या सावलीत
सांग उभा राहू
हिंडोळ्याचे झोके
सांग कसे घेऊ ...............
तेव्हा कुठे आज असे खरे पटले .....................
"मनुष्य हि जगातली सर्वात हिंस्त्र आणि वाईट जात आहे ............."
:- माझे घरामागचे झाड जेव्हा जाळले गेले कुणा बिल्डर च्या जागेपायी ............खरच तेव्हा मनुष्य वधाचा गुन्हा लागू झाला त्यावर ...........( पण तो सुटला दुसरे झाड लाऊन ....माझे झाड मला पुन्हा मिळणे नाही ...........)
सुजित ( धवल ध्रुव )
पुन्हा कधी तिने नकार दिला नाही
तो आज आलाय
पुन्हा तिला भेटायला
आधीचा नकार
पुन्हा होकारात बदलायला ...........||
तीच पायरी , तोच जिना ............
माळा ही तोच आणि गच्ची
मोहाचे क्षण , पावसाचे थेंब ...
हवेतला गारवा , लगन सच्ची.............||
पण ती त्या दिवशी नाही म्हणाली होती .......................
आज पाऊस काही करेल काय ??
आणि काय गम्मत ..........
पावसाने काम केले ............
विजा कडाडल्या .....
ती काहीशी घाबरली ...
जराशी मिठीत आली ....
माझीही पकड घट्ट झाली .....
तिचा स्पर्श मला ....
माझा स्पर्श तिला ...
आपसूकच हवा होता ....
गर्द निळ्या आभाळामध्ये
काळा मेघ दाटला होता ....
आल्या प्रत्येक क्षणाला ...
विसरून आम्ही हरवलो होतो
तुझ्या माझ्यात ................
हे खरेच काय आहे ?
जे आजवर अनुभवलं नाही ...
होतं सारं माळरान आपलं
तरी कधी जराही चाखलं नाही .......
तो बरसत होताच ..........
गच्चीच्या दरवाज्यातून
आम्हाला हळूच भिजवत होताच
तिचे ओठ तेव्हा दिसले
आणि परावृत्त नाही झालो
वाढलेल्या पाना मधले
सारे हलाहल प्यालो .....
तीही तशीच अगतिक
रोम रोमात भरत होती
श्वासातील कोवळे
मादकपाणी भरत होती .......
चिंब चिंब भिजलो तेव्हा
पावसा विना
तो तर बाहेर पडत होता
आत तर आम्ही दोघेच ना !!!!!!!!
पुन्हा कधी तिने नकार दिला नाही ...................
पावसाने धरतीला उगाच भिजवले नाही .............
:- सुजित ( धवल ध्रुव )
पुन्हा तिला भेटायला
आधीचा नकार
पुन्हा होकारात बदलायला ...........||
तीच पायरी , तोच जिना ............
माळा ही तोच आणि गच्ची
मोहाचे क्षण , पावसाचे थेंब ...
हवेतला गारवा , लगन सच्ची.............||
पण ती त्या दिवशी नाही म्हणाली होती .......................
आज पाऊस काही करेल काय ??
आणि काय गम्मत ..........
पावसाने काम केले ............
विजा कडाडल्या .....
ती काहीशी घाबरली ...
जराशी मिठीत आली ....
माझीही पकड घट्ट झाली .....
तिचा स्पर्श मला ....
माझा स्पर्श तिला ...
आपसूकच हवा होता ....
गर्द निळ्या आभाळामध्ये
काळा मेघ दाटला होता ....
आल्या प्रत्येक क्षणाला ...
विसरून आम्ही हरवलो होतो
तुझ्या माझ्यात ................
हे खरेच काय आहे ?
जे आजवर अनुभवलं नाही ...
होतं सारं माळरान आपलं
तरी कधी जराही चाखलं नाही .......
तो बरसत होताच ..........
गच्चीच्या दरवाज्यातून
आम्हाला हळूच भिजवत होताच
तिचे ओठ तेव्हा दिसले
आणि परावृत्त नाही झालो
वाढलेल्या पाना मधले
सारे हलाहल प्यालो .....
तीही तशीच अगतिक
रोम रोमात भरत होती
श्वासातील कोवळे
मादकपाणी भरत होती .......
चिंब चिंब भिजलो तेव्हा
पावसा विना
तो तर बाहेर पडत होता
आत तर आम्ही दोघेच ना !!!!!!!!
पुन्हा कधी तिने नकार दिला नाही ...................
पावसाने धरतीला उगाच भिजवले नाही .............
:- सुजित ( धवल ध्रुव )
दूर देशी गेला यार ..............
काल भरपूर नाचला असशिलच ,
आणि झिंगून गेला असशील अगदी ....
मित्र मैत्रिणीच्या ताफ्यात
हरवून गेला असशील अगदी .....
आज थोडी जास्त घेतो .........
काय फरक पडणार आहे ?
नाहीतरी आपण काय
नशेत कुठे पडणार आहे ?
दूर देशी गेला यार
तुला आठवू किती रे ...
दर सांजेला आठव येई
तुलाही येतो का रे ?
असतील किती हाथ तिथे
तुला सांभाळन्या ......
असतील तितकेच खांदे
तुझ्या अश्रुंना वाट देण्या....
अरे असशील तू मजेत अगदी
केलास कधी माझा तू विचार ?
का नाही पुसलास मला
का नाही आला माझा विचार ?
मित्रा मित्र असतात खुप
मला तुझ्याविना कोणी नाही
असतील तुला अगदीच खुप
मलातर तुझ्याविना कुणी आठवत नाही ..
मित्रा मैत्रीत कर एवढा त्याग
असे सांगाया लावू नको
असेल भाव जर मैत्रीचा
तर बोलायला धजू नको
करीन मी तसाही गुजारा
आणखीन काय करू मी ?
विसरु तर नाही शकत
तरी राहू कसा असा मी ?
उद्या उजाडेल तेव्हा
नसेन या जीवनात मी
घेऊन आठवणी तुझ्या
सोडून जग जायींन मी ..
तेव्हा तरी निदान
तेव्हा तरी निदान येशील का ?
दूर देशी गेला यार
पुन्हा परतशील का ??????
आणि झिंगून गेला असशील अगदी ....
मित्र मैत्रिणीच्या ताफ्यात
हरवून गेला असशील अगदी .....
आज थोडी जास्त घेतो .........
काय फरक पडणार आहे ?
नाहीतरी आपण काय
नशेत कुठे पडणार आहे ?
दूर देशी गेला यार
तुला आठवू किती रे ...
दर सांजेला आठव येई
तुलाही येतो का रे ?
असतील किती हाथ तिथे
तुला सांभाळन्या ......
असतील तितकेच खांदे
तुझ्या अश्रुंना वाट देण्या....
अरे असशील तू मजेत अगदी
केलास कधी माझा तू विचार ?
का नाही पुसलास मला
का नाही आला माझा विचार ?
मित्रा मित्र असतात खुप
मला तुझ्याविना कोणी नाही
असतील तुला अगदीच खुप
मलातर तुझ्याविना कुणी आठवत नाही ..
मित्रा मैत्रीत कर एवढा त्याग
असे सांगाया लावू नको
असेल भाव जर मैत्रीचा
तर बोलायला धजू नको
करीन मी तसाही गुजारा
आणखीन काय करू मी ?
विसरु तर नाही शकत
तरी राहू कसा असा मी ?
उद्या उजाडेल तेव्हा
नसेन या जीवनात मी
घेऊन आठवणी तुझ्या
सोडून जग जायींन मी ..
तेव्हा तरी निदान
तेव्हा तरी निदान येशील का ?
दूर देशी गेला यार
पुन्हा परतशील का ??????
Wednesday, July 21, 2010
उगाच काही चारोळ्या
जाहल्या त्याही चुका
ज्या न होता होता
राहिले होते जे मर्म
गळुनी सारे गेले ....
२........
स्वभावे शोधिता औषधी नाही
परी जन्मता रोग हा लागीयेला ||
३...........
ज्याला समोर बोलता येत नाही
ते आडून बोलतात.........
आणि ज्याला तेही जमत नाही
ते मुक्यांपेक्षा कमी नसतात ||
४.........
तुला पाहताना हवेस सारे
कसे काय कळायचे
वाळलेले कपडे सारे
तुझ्या चेहरयावर वळायचे ||
५.............
तुझ्या हातचे वडे
जणू वाटतात घोडे
पोटात गेल्यावर इतक्या जोरात दौडे
कि मी स्वतः दौडे ..........||
६...................
खरच स्वप्न खरी होतात का ?
कि असतात नुसत्या कल्पना ?
काही का असेना ..त्या
असतो मात्र जगण्याचा बहाणा !! ................
उरलेल्या नंतर कधी ..............
ज्या न होता होता
राहिले होते जे मर्म
गळुनी सारे गेले ....
२........
स्वभावे शोधिता औषधी नाही
परी जन्मता रोग हा लागीयेला ||
३...........
ज्याला समोर बोलता येत नाही
ते आडून बोलतात.........
आणि ज्याला तेही जमत नाही
ते मुक्यांपेक्षा कमी नसतात ||
४.........
तुला पाहताना हवेस सारे
कसे काय कळायचे
वाळलेले कपडे सारे
तुझ्या चेहरयावर वळायचे ||
५.............
तुझ्या हातचे वडे
जणू वाटतात घोडे
पोटात गेल्यावर इतक्या जोरात दौडे
कि मी स्वतः दौडे ..........||
६...................
खरच स्वप्न खरी होतात का ?
कि असतात नुसत्या कल्पना ?
काही का असेना ..त्या
असतो मात्र जगण्याचा बहाणा !! ................
उरलेल्या नंतर कधी ..............
Friday, January 1, 2010
तस भरपुर होत होते आणि होईल अगदी आणखीन काही, राहणार्या मागे त्यांना काय करायचे आहे
सारे कसे स्वतला मी किती मोठा झालोय हे सांगायच्या तयारीत
अरे पण कधी इतरांचा विचार केलात ?
आणि विचारले जरी असते तरी त्याचा काय तो फायदा ??
इथे इतरांचे कोणाला काय सोयरे आणि सुतक ??
जो तो फक्त आपली पोळी भाजून घेतो आहे.
काय तर म्हणे २०१२ आणि ते वर्ल्ड संपणार वगैरे
बर ठीक आहे , मानले की जग संपेल .म्हणून काय आतच आपली चिता सजवून ठेवायची ??
आणि करायचा कोणी उभा आपल्या मागे आग द्यायला !!
बघ जमते का ??
आयुष्य म्हणजे इथे एक गंमत असते म्हणूनच मला हे सगळे नकोसे वाटते !!!
सारे कसे स्वतला मी किती मोठा झालोय हे सांगायच्या तयारीत
अरे पण कधी इतरांचा विचार केलात ?
आणि विचारले जरी असते तरी त्याचा काय तो फायदा ??
इथे इतरांचे कोणाला काय सोयरे आणि सुतक ??
जो तो फक्त आपली पोळी भाजून घेतो आहे.
काय तर म्हणे २०१२ आणि ते वर्ल्ड संपणार वगैरे
बर ठीक आहे , मानले की जग संपेल .म्हणून काय आतच आपली चिता सजवून ठेवायची ??
आणि करायचा कोणी उभा आपल्या मागे आग द्यायला !!
बघ जमते का ??
आयुष्य म्हणजे इथे एक गंमत असते म्हणूनच मला हे सगळे नकोसे वाटते !!!
Subscribe to:
Comments (Atom)