मी येतोय ....
कशाला आलात
या भुतांच्या स्मशानात ....??
काय , मला शेवटचे पाहण्यासाठी ?
का आलात आठवणीच्या पुसण्या भेटी गाठी ?
खरं संग आज तुझ्या मनात काय आहे ?
तू हेच म्हणत आहेस ना कि ,'' मेल्या आता तरी मर ...
जिवंतपणी जगू दिले नाही , मेल्या आता तरी मर ."
अगं जिवंत असताना तुझ्या आठवणीने जळत होतो
आता मेल्यावर सरणावर जळत आहे
जिवंत असताना तरी तुझी भेट झाली नाही
आता मात्र ती पूर्ण होणार आहे ......
आज इतकाच फरक आहे
तू जिवंत , मी मेलेलो आहे
तुझ्या हाती बाळ
माझ्या मागे काळ आहे .....
जा सुखी रहा !!
आपला संसार पहा
देवाकडे जाईन आणि म्हणेन
" देवा का रे असा कोपलास माझ्यावर
का नाही केलेस मला तिचा उपवर "
अरे तूच मला निर्माण केले
तूच तिला निर्माण केले
मग कोणत्या फरकाने
आम्हाला वेगळे केले ?
तुझा मात्र विजय झाला
माझी मात्र राख झाली !!"
पुढच्या जन्मात पुन्हा तुझ्या
वाटेवर उभा असेन मी
आताच्या तुझ्या नवऱ्याला
सात जन्म मागे ढकलेन मी ....
फक्त तू तयार रहा
मी येतोय .....मी येतोय .....मी येतोय ....||
:- सुजीत शिंदे ....(धवल ध्रुव)
या भुतांच्या स्मशानात ....??
काय , मला शेवटचे पाहण्यासाठी ?
का आलात आठवणीच्या पुसण्या भेटी गाठी ?
खरं संग आज तुझ्या मनात काय आहे ?
तू हेच म्हणत आहेस ना कि ,'' मेल्या आता तरी मर ...
जिवंतपणी जगू दिले नाही , मेल्या आता तरी मर ."
अगं जिवंत असताना तुझ्या आठवणीने जळत होतो
आता मेल्यावर सरणावर जळत आहे
जिवंत असताना तरी तुझी भेट झाली नाही
आता मात्र ती पूर्ण होणार आहे ......
आज इतकाच फरक आहे
तू जिवंत , मी मेलेलो आहे
तुझ्या हाती बाळ
माझ्या मागे काळ आहे .....
जा सुखी रहा !!
आपला संसार पहा
देवाकडे जाईन आणि म्हणेन
" देवा का रे असा कोपलास माझ्यावर
का नाही केलेस मला तिचा उपवर "
अरे तूच मला निर्माण केले
तूच तिला निर्माण केले
मग कोणत्या फरकाने
आम्हाला वेगळे केले ?
तुझा मात्र विजय झाला
माझी मात्र राख झाली !!"
पुढच्या जन्मात पुन्हा तुझ्या
वाटेवर उभा असेन मी
आताच्या तुझ्या नवऱ्याला
सात जन्म मागे ढकलेन मी ....
फक्त तू तयार रहा
मी येतोय .....मी येतोय .....मी येतोय ....||
:- सुजीत शिंदे ....(धवल ध्रुव)
No comments:
Post a Comment