Monday, September 20, 2010













पुन्हा कधी तिने नकार दिला नाही

तो आज आलाय

पुन्हा तिला भेटायला

आधीचा नकार

पुन्हा होकारात बदलायला ...........||



तीच पायरी , तोच जिना ............

माळा ही तोच आणि गच्ची

मोहाचे क्षण , पावसाचे थेंब ...

हवेतला गारवा , लगन सच्ची.............||



पण ती त्या दिवशी नाही म्हणाली होती .......................



आज पाऊस काही करेल काय ??

आणि काय गम्मत ..........

पावसाने काम केले ............

विजा कडाडल्या .....

ती काहीशी घाबरली ...

जराशी मिठीत आली ....

माझीही पकड घट्ट झाली .....

तिचा स्पर्श मला ....

माझा स्पर्श तिला ...

आपसूकच हवा होता ....

गर्द निळ्या आभाळामध्ये

काळा मेघ दाटला होता ....

आल्या प्रत्येक क्षणाला ...

विसरून आम्ही हरवलो होतो

तुझ्या माझ्यात ................

हे खरेच काय आहे ?

जे आजवर अनुभवलं नाही ...

होतं सारं माळरान आपलं

तरी कधी जराही चाखलं नाही .......



तो बरसत होताच ..........

गच्चीच्या दरवाज्यातून

आम्हाला हळूच भिजवत होताच



तिचे ओठ तेव्हा दिसले

आणि परावृत्त नाही झालो

वाढलेल्या पाना मधले

सारे हलाहल प्यालो .....



तीही तशीच अगतिक

रोम रोमात भरत होती

श्वासातील कोवळे

मादकपाणी भरत होती .......



चिंब चिंब भिजलो तेव्हा

पावसा विना

तो तर बाहेर पडत होता

आत तर आम्ही दोघेच ना !!!!!!!!



पुन्हा कधी तिने नकार दिला नाही ...................

पावसाने धरतीला उगाच भिजवले नाही .............



:- सुजित ( धवल ध्रुव )

No comments: