मला खर तर मराठी कुटुंबपद्धती वर प्रबंध लिहायचा होता मात्र खरेच हे आता लुप्त होत चालले आहेत म्हणून तेही जमत नाही. मात्र कधी तरी हे जमणारच नाही म्हणून आता हे शक्य झाल्याने जमेल तितके लिहीण्याचा प्रयत्न करतो.
पुर्वी कुटुंब म्हणजे बाबा ,आई ,आजोबा ,आजी ,काका ,काकी ,तात्या ,अण्णा , असे क्रित्येक जण होते. आज मात्र फक्त आई आणि बाबा राहीले आहेत . आजोबा गावी किवा दुसर्या फ्लॅट मधे आणि नातवंडे हॉस्टेल किवा
आउट स्टेशन असतात. आता आउट स्टेशन म्हणजे काय बाहेर गावी नसून अमेरिका किवा फ्रांस असते .
तसे खरे तर सगळ्याच घरात हा फरक नाही आला, मात्र तसे ही ते हाताच्या बोटावर मोजण्या इतपतच आहेत.
आणि खरे तर शहरी वातावरणात तर हा फरक जाणवणे खूपच सहज शक्य आहे. पुर्वी कोणताही सण, सण होता आणि त्यात सणाचे पावित्र्य होते.
दिवाळीत मुले आणि बाबा मिळून कंदील बनवत ,आजोबा देवघर नीटनेटके करत.आजी दिव्यांची आरास करत आणि आई फराळाची तयारी करीत असे .सगळे कसे एखाद्या उत्सवाप्रमाणे वाटे .आजकाल तर कंदीलापासून ते फराळापर्यंत सारेच कसे रेडिमेड मिळते .आणि देव तर कधीचेच प्लास्टिकचे झालेत. बर यात माझ्या कुटुंबपद्धती या विषयावर बोलायचे तर अगोदरचे विषय स्पष्टीकरण देऊन झाले आहे .बाकीचा प्रबंध मग कधी तरी...........
-सुजीत शिंदे
